‘झोपु’ योजनेंतर्गत झोपडीधारकांना लवकरात लवकर घरे देण्यासाठी प्रयत्नशील – जितेंद्र आव्हाड

488

झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही मुंबईतील गरीब झोपडीधारकांसाठी असून आपण सर्वप्रथम झोपडीधारकांचा विचार करुन त्यांना त्यांचे हक्काचे घर लवकरात लवकर कसे मिळेल यासाठी प्रयत्नशील आहोत, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

मंत्री आव्हाड यांनी शुक्रवारी वांद्रे येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात मुंबई व ठाणे विभागातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंदर्भातील अडीअडचणींबाबत आव्हाड यांनी यावेळी विकासक व वास्तुविशारद यांच्याशी चर्चा केली. झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना येणाऱ्या अडचणी जसे, पात्र झोपडपट्टीधारकाचे परिशिष्ठ -2 तयार करणे, योजनेसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळविणे, भाडे संदर्भातील तक्रार अशा विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या. या बैठकीस झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर व विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या