
शेख हसीना यांना राजाश्रय दिल्यामुळे नाराज असलेल्या बांगलादेशने हिंदुस्थानला झटका दिला आहे. बांगलादेशातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे बंदर असलेले चंटगाव बंदर चीनसाठी खुले करण्याचा निर्णय तेथील हंगामी सरकारने घेतला आहे.
बांगलादेशात लवकरच सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधीच बांगलादेशचे प्रमुख बंदर चीनला सोपवण्याची तयारी सुरू आहे. बांगलादेशच्या एकूण आयात आणि निर्यात व्यापारापैकी तब्बल 92 टक्के व्यवहार याच बंदरातून चालतो. राजकीय पक्ष आणि व्यावसायिक संघटनांनी या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त करत यास विरोध दर्शवला आहे.