हे करून पहा – कडधान्य दीर्घकाळ टिकवायचे आहे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धान्य साठवण्यासाठी काच, प्लॅस्टिक किंवा ऍल्युमिनियमचे हवाबंद डब्याचा वापर करा. कीड लागू नये म्हणून धान्याच्या डब्यात काही लवंगा ठेवाव्यात, यामुळे कीड लागत नाही व सुगंधही येतो.

कडुलिंबाची सुकलेली पाने असतील तर त्याचाही वापर करता येऊ शकतो. कडधान्यामध्ये कडुनिंबाची पाने टाकल्याने कीड लागत नाही.

कडधान्य शक्यतो ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येणार नाही अशा ठिकाणी ठेवावीत. धान्य साठवण्यापूर्वी ते कोरडे आहे का हे तपासून घ्या. नाहीतर त्याला बुरशी लागू शकते. वेळोवेळी कडधान्यांची तपासणी करा.