चोरटयांचा धुमाकुळ, एकाच रात्री 10 दुकाने फोडली

>> संतोष तागडे । आष्टी

तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा येथे एकाच रात्री 10 दुकाने फोडून चोरटयांनी धुमाकुळ घातल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. 9 सप्टेंबर रोजी रात्री चोरट्यांनी कडा बाजारपेठेती 8 दुकाने, आष्टी येथील नगर बीड रोडवरील एक कंट्रक्शनचे कार्यालय, तर धानोरा येथील एक मेडिकल स्टोअर फोडून त्यातील ऐवज घेवून चोरटे पसार झाले आहेत.

पहारीच्या सहाय्याने दुकानांचे शटर खोलून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चोरांची मोठी टोळी असून ही टोळी चोरीसाठी चार चाकी मधून येत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. घटनेची माहिती कळताच अंभोरा पोलिसांनी धाव घेतली असून घटनेचा पंचनाम्याची कारवाई सुरू होती. नेमका ऐवज किती गेला हे अद्याप समजू शकले नाही. या व्यतिरिक्त अनेक दुकाने फुटली असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.

पोलीस प्रशासन करते काय?

एकाच रात्री कडयात 8 दुकाने फुटतात, पोलीस प्रशासन करते काय? याची खबर देखील पोलिसांना नाही, त्यामुळे शहरामध्ये रात्री गस्त होते की नाही असी चर्चा कडा शहरातील नागरिकांतून होत आहे.