
सामना ऑनलाईन, मुंबई
यंदाची दहावीची परीक्षा बदलेल्या अभ्यासक्रमानुसार होणार आहे. त्यामुळे सरावासाठी विद्यार्थ्यांना बालभारतीने सराव कृतिपत्रिका उपलब्ध करून दिल्या होत्या. आता या सराव कृतिपत्रिकांचा दुसरा टप्पादेखील उपलब्ध झाला आहे. बालभारतीच्या www.ebalbharati.in या वेबसाईटवर प्रत्येक विषयांच्या कृतिपत्रिका प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
परीक्षेच्या सरावासाठी विद्यार्थ्यांनी या कृतिपत्रिका स्वतः सोडवायच्या असून गरज भासल्यास शिक्षक, पालकांचे मार्गदर्शन घ्यायचे आहे. संबंधित विषयाची कृतिपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी त्याची ‘संक्षिप्त उत्तरपत्रिका’ प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच संबंधित विषय तज्ञांचे त्या-त्या प्रश्नासंदर्भातील मत व्यक्त करणारे व्हिडीओदेखील प्रसिद्ध केले जाणार आहेत.
भाषा कृतिपत्रिका संक्षिप्त उत्तरपत्रिका
तृतीय भाषा 26 डिसेंबर 5 जानेवारी
विज्ञान 1 27 डिसेंबर 6 जानेवारी
विज्ञान 2 28 डिसेंबर 7 जानेवारी
गणित 1 29 डिसेंबर 8 जानेवारी
गणित 2 30 डिसेंबर 9 जानेवारी
इतिहास-
राज्यशास्त्र 31 डिसेंबर 10 जानेवारी
भूगोल 1 जानेवारी 11 जानेवारी
तामिळ,
मल्याळम,
इतर भाषा 2 जानेवारी 12 जानेवारी
ऊर्दू माध्यम 2 जानेवारी 12 जानेवारी





























































