वाघांच्या मृत्यूमध्ये राज्याचा क्रमांक दुसरा, या राज्यात सर्वाधिक मृत्यू

गेल्या वर्षात संपूर्ण देशात 181 वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांच्या मृत्यूंमध्ये राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. या वर्षी देशात तब्बल 47 वाघांचा मृत्यू झाला आहे.

वाघांच्या मृत्यूमध्ये राज्याचा क्रमांक दुसरा

या वर्षी एक जानेवारी ते 12 एप्रिलदरम्यान 47 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक 17 वाघांचा मृत्यू हा मध्य प्रदेशमध्ये झाले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 11 वाघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यात मिळून संपूर्ण देशात संपूर्ण मृत वाघांची ही संख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर कर्नाटकात सहा, उत्तर प्रदेशमध्ये तीन, राजस्थान, केरळ, तेलंगणा आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी दोन तर छत्तीसड आणि ओडीशात प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्राचा क्रमांक पहिला

गेल्या वर्षी देशात 181 वाघांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले होते. महाराष्ट्रात 45 वाघांचा मृत्यू झाला होता. तर मध्य प्रदेशमध्ये 43 वाघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उत्तराखंडमध्ये 21, तमिळनाडूत 15, केरळमध्ये 14, कर्नाटकात 12 तर आसाममध्ये 12 वाघांचा मृत्यू झाला होता. 2023 मध्ये 181 पैकी फक्त 44 वाघांचा मृत्यू नैसर्गिक होता. तर 9 वाघांची शिकार करून त्यांना ठार करण्यात आलं होतं. 115 वाघांच्या मृत्यूचे कारणाचा तपास अजूनही सुरू आहे. सात वाघांचा मृत्यू हा अनैसर्गिक कारणांनी झाला आहे.