दीर्घायुष्यासाठी कोंबडीचा मेंदू खा! 111 वर्षांच्या माणसाने सांगितले रहस्य

दीर्घायुष्य हवे असेल तर कोंबडीचा मेंदू खा असा सल्ला 111 वर्षांच्या आजोबांनी दिला आहे. डेक्स्टर क्रूगर असं या आजोबांचे नाव असून ते ऑस्ट्रेलियात राहातात. क्रूगर यांची ऑस्ट्रेलिअन ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनतर्फे मुलाखत घेण्यात आली. यामध्ये त्यांना दीर्घायुष्याचे रहस्य विचारण्यात आले होते.

पहिल्या विश्व युद्धात सहभागी झालेल्या जॅक लॉकेट हे 111 वर्ष 123 दिवस जगले होते. त्यांचा 2002 साली मृत्यू झाला होता. क्रूगर हे सोमवारी त्यांच्यापेक्षा जास्त जगणारी व्यक्ती झाले आहेत. क्रूगर यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की “तुम्हाला माहिती आहे की कोंबडीला डोकं असतं, त्यात मेंदू असतो. हा मेंदू एका घासात संपतो आणि चवीला लाजवाब लागतो.” क्रूगर यांचा मुलगा ग्रेग याचे वय 74 वर्ष आहे. त्याने त्याच्या वडिलांबाबत बोलताना म्हटले की साधी राहाणी हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. क्रूगर यांची नर्सिंग होममध्ये देखभाल करणाऱ्या मेलनी कॅलव्हर्ट यांनी सांगितलं की क्रूगर हे अत्यंक कुशाग्र बुद्धीमत्तेचे आहेत. त्यांची स्मरणशक्तीही दांडगी असल्याचं मेलनी सांगतात. .

आपली प्रतिक्रिया द्या