दोन सिंहांचा भांडणात मृत्यू, गीरच्या जंगलात अकरा दिवसांत 12 दगावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गांधीनगर

सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गीरच्या अभयारण्यात गेल्या अकरा दिवसांत बारा सिंहांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील 10 सिंहांच्या आतड्यांना संसर्ग झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर दोन सिंह हे आपआपसातील भांडणामुळे मृत्युमुखी पडले असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी गुजरात सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

गीर अभयारण्यातील आमरेली व रोनिया भागात या सिंहांचे शव आढळून आले आाहेत. यातील दहा सिंहांना फेलीन लुकेमिया हा आजार असल्याचे शवविच्छेदनात समोर आले, अशी माहिती अभयारण्याचे अधिकारी पी. पुरुषोत्तमा यांनी सांगितले.

गुजरातमधले ‘गीर’ हे सिंहासाठी राखीव संरक्षित वनक्षेत्र घोषित केलेले अभयारण्य आहे. 2015 ला झालेल्या गणनेनुसार गीरमध्ये 523 सिंह आहेत.