रत्नागिरीत त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह 

952

राजिवडा परिसरात कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यावर त्या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 13 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल आज प्राप्त झाला. रत्नागिरी शहरातील राजिवडा भागात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर या भागाला सील करण्यात आले असून याबाबत नकाशासह प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. या भागात कुणीही जाणार नाही व यातून कोणी बाहेर येणार नाही याची खबरदारी प्रशासन व पोलीस यांच्या माध्यमातून घेतली जात आहे. या भागातील घराघरात आरोग्य सर्वेक्षणाचे काम कालच सुरू करण्यात आलेले आहे. जिल्हा रुग्णालयात 25 जण दाखल असून जिल्ह्यात एकूण दाखल रुग्णांची संख्या 34 आहे.

पुणे येथे 13 जणांचे  नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ह्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाहेरील जिल्ह्यातून प्रवास करून आलेल्या नागरिकांना  क्वारंटाइन करण्यात आलेले आहे . अशा संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या 337 इतकी आहे. जिल्ह्यात होम क्वारंटाइन खाल्ली ठेवण्यात आलेल्यांची संख्या आज 981 इतकी आहे.

परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी जिल्ह्यात 53 निवारा गृह सुरू आहेत. याच 150 जणांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या