आई रागवेल या भीतीने 13 वर्षांच्या मुलाची आत्महत्या

60

सामना प्रतिनिधी । कराड

विंग (ता.कराड) येथील आदित्य बाबू कदम या सातवीमध्ये शिकणाऱ्या 13 वर्षांच्या विद्यार्थ्याने आई रागवेल या भीतीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. आदित्य घरातील शेळी घेऊन रानात चरण्यासाठी गेला होता. शेळी चरत असताना शेळीला अचानक फास लागल्याने त्या शेळीचा जागीच मृत्यू झाला. शेळीचा मृत्यू झाल्याने आता घरी काय सांगायचे, आई आपल्याला रागवेल या भीतीने आदित्यने शेताशेजारी असलेल्या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली.

आई रागवणार या भीतीने आदित्यने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती असून काल सोमवारी ही घटना घडली आहे. संध्याकाळपर्यंत आदित्य घरी न आल्याने आई वडील व नातेवाइकांनी शोधण्यास सुरुवात केली. त्याचा मृतदेह मंगळवारी विहिरीत दिसला. छत्रपती शिवेंद्रराजे टेकर्सच्या मदतीने तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या