कॉम्प्युटरच्या 14 भाषा केल्या आत्मसात; 13 वर्षांच्या अर्णवची कमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर एखादी गोष्ट शिकायची असेल तर वय कितीही असले तरी फरक पडत नाही. कोईम्बतूरच्या अर्णव शिवरामने वयाच्या 13 व्या वर्षी हेच सिद्ध करून दाखवले. अर्णवने एवढय़ा लहान वयात संगणकाच्या 17 भाषा आत्मसात केल्या आहेत, अशी कामगिरी करणारा तो सर्वात लहान मुलगा ठरला आहे.    

इयत्ता चौथीत असल्यापासून अर्णवने कॉम्प्युटर शिकायला सुरुवात केली. अर्णवने सांगितले, मी जावा आणि पायथन याच्यासह 17 प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकलो आहे. मला भविष्यात ऑटो पायलटसाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स बनवायचे आहे. काही शिकायचे असेल तर वय कधीच आड येत नाही. मनात जिद्द आणि महत्त्वाकांक्षा असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, असेही त्याने सांगितले.

याआधी 2018 साली वयाच्या 13 व्या वर्षी केरळचा आदित्यन राजन दुबईमधील  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीचा मालक बनला होता. त्याने  नवव्या वर्षी एक ऍप तयार केले होते.  आदित्यन वयाच्या पाचव्या वर्षी कुटुंबासमवेत दुबईला राहायला गेला.