सांगलीत संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी 15 यांत्रिक बोटींचे लोकार्पण

243

सांगली जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या 15 यांत्रिक बोटींचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. बोटींच्या क्षमतेनुसार नदीपात्रात प्रात्यक्षिकही घेण्यात आले. संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे दिसून आले. यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम, , आमदार मानसिंग नाईक, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या