
साऊथ आफ्रिकेतील इस्वातिनी देशाचा राजा मस्वाती III चा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्यून आफ्रिकन राजाच्या विलासी जीवनशैलीकडे लक्ष वेधून घेत आहे.या व्हिडीओमध्ये राजा विमानाने प्रवास करून आबूदाबी विमानतळावर आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या एक दोन नव्हे तर तब्बल 15 पत्नी होत्या. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान या व्हिडीओमध्ये राजा मस्वाती त्यांच्या पारंपारिक पोशाखात एका खाजगी जेटमधून उतरताना दिसत आहे. तर त्यांच्या मागे काही महिलाही येताना दिसत आहे. या व्हिडीओवर एक कॅप्शनही लिहिलेले आहे. “स्वाझीलंडचा राजा 15 पत्नी आणि 100 नोकरांसह अबू धाबी येथे आले आहेत. एवढेच नव्हे तर मस्वाती यांचे वडील राजा सोभुजा II यांना 125 पत्नी होत्या, असे कॅप्शन देण्यात आले आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, अबू दाबीतील या दौऱ्यावर राजा मस्वाती यांच्यासोबत त्यांच्या 15 पत्नींसोबत त्यांची 30 मुलेही होती. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी योग्य तयारी केली असल्यामुळे कोणताही गोंधळ झाला नाही. मात्र राजा मस्वाती यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी राग व्यक्त केला आहे. तर काहींनी त्या देशाच्या संस्कृतीबाबत विचारणा केली आहे.
साऊथ आफ्रिकेतील इस्वातिनी देशाची आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे युजर्सने सांगितले. या देशाचा राजा अगदी थाटात राहतोय, पण त्याची प्रजा मात्र हालाकीचे जीवन जगत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, हा देश इतका श्रीमंत आहे की याचा राजा थेट प्रायव्हेट जेटमधून प्रवास करतोय. असे अनेक प्रश्न युजर्सनी केले आहेत.
आफ्रिकेचा शेवटचा सम्राट, राजा मस्वती III, 1986 पासून दक्षिण आफ्रिकेतील या छोट्या राष्ट्रावर राज्य करत आहेत. अनेक अहवालांनुसार त्यांची वैयक्तिक संपत्ती 1 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. मात्र सध्या या राज्याची परिस्थिती बेताची आहे. या राज्यालाकोलमडलेली आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था, सार्वजनिक रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा यांसारख्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.