येऊरच्या जंगलात आढळले 157 पशूपक्षी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन , ठाणे

चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर परिसरात बुद्ध पौर्णिमेदिवशी झालेल्या प्राणीगणनेत तब्बल 157 पशुपक्ष्यांची नोंद झाली आहे. पारंपरिक पद्धतीने होणाऱया या शिरगणतीत वनविभागाच्या कर्मचाऱयांसह सर्वसामान्यही सहभागी झाले होते. त्यामुळे बिबटय़ा, घुबड, माकड, वटवाघूळ असे प्राणी व पक्षी सर्वसामान्यांना प्राणीगणनेतून ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याची संधी मिळाली आहे.

बुद्धपौर्णिमेला चांदण्यांच्या प्रकाशामध्ये महाराष्ट्रातील सर्वच राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांची शिरगणती करण्यात आली. त्यानुसार 103 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील येऊरच्या 13 पाणवठय़ांसमोर मचाण बांधण्यात आले होते. त्यावर बसलेल्या स्वयंसेवकांनी प्राणी व पक्ष्याची गणना केली. यामध्ये यंदा केवळ एकच बिबटय़ा येऊरमध्ये दिसला असून याआधी 2015 मध्ये दोन, 2016 मध्ये तीन, 2017 व 18 मध्ये अनुक्रमे चार बिबटय़ांची शिरगणतीत नोंद झाली होती. यंदा बिबटय़ा पाणवठय़ावर न दिसत येऊरच्या एअरपर्ह्स परिसरातील हुमायून बंधाऱयासमोर लावण्यात आलेल्या ट्रप पॅमेऱयात पैद झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.

दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांचे दर्शन दुर्लभ

येऊर परिसरात 2016 साली झालेल्या प्राणीगणनेत ‘श्रीलंकन फ्रॉग माऊथ’ या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन झाले होते. याआधी फणसाळच्या अभयारण्यात दिसणारा हा पक्षी श्रीलंकेत तसेच हिंदुस्थानात दक्षिणेकडील राज्यात आढळून येत असे. मात्र अशा कोणत्याही दुर्मिळ पक्षी अथवा प्राण्यांचे शिरगणतीदरम्यान दर्शन न झाल्याचे येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले. यासोबतच यंदा जंगली मांजर, सांबर, हरीण, माकड, मुंगूस, घुबड, वटवाघूळ या आणि अशा अनेक 157 प्राणी-पक्ष्यांचे दर्शन झाले.