नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाहियेत. बदलापूरची घटना ताजी असताना नालासोपाऱ्यात एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीची मैत्रीण नालासोपाऱ्यात रहायची. तिला भेटण्यासाठी तरुणी नालासोपाऱ्यात यायची. या मैत्रिणीच्या घराशेजारी एका फोटो स्टुडियोमध्ये काम करणाऱ्या सोनू नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. सोनुने तरुणीला एका नालासोपारा स्टेशनला भेटायला बोलावलं. त्यावेळी सोनुसोबत त्याचा मित्रही होता. या दोघांनी तिला रिक्षाने एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणी घरी आली आणि तिने झाला प्रकार आई वडिलांना सांगितला.

आई वडिलांनी या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.