विद्यार्थ्याने बनविले मनावर नियंत्रण मिळवणारे रोबोटीक हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरीकेच्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने एक अनोखा आविष्कार केला आहे. या विद्यार्थ्याने एक रोबोटिक हात बनवला आहे. या रोबोटिक हाताचे वैशिष्ट्य म्हणजे यामुळे हा रोबोट माणसाच्या मनावर नियंत्रण करु शकणार आहे. त्याच्या या अनोख्या कलाकृतीचे सगळीकडे कौतुक होत आहे.

बेंजाईन चोई असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षांच्य़ा बेंजामिनला रोबोटीक हात बनविण्याची कल्पना एका अमेरीकन टीव्ही प्रोग्रामच्या तासाभराच्या एपिसोड पाहून आली. त्यात संशोधक एका रुग्णाच्या डोक्याजवळ एक लहान सेन्सर लावतो. ज्यामधून रुग्ण रोबोटीक हाताच्या मदतीने मनावर नियंत्रण करु शकतो. स्मिथसोनिएन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत बेंजामिनने सांगितले, तो या तंत्राने फार प्रभावित झाला. मात्र तो त्रस्तही होता कारण त्यासाठी ओपन ब्रेन सर्जची आवश्यकता होती आणि ती जोखीम होती.

बेंजामिनला आपल्या अभ्यासादरम्यान रोबोट बनवणे आणि कोडिंग करण्याचा आधीपासूनच अनुभव होता. त्याने आपल्या बहिणीचा थ्रीडी प्रिंटर आणि फिशिंग लाइनचा वापर करून रोबोटिक हाताचे छोटे तुकडे केले. नंतर ते सर्व भाग एकत्र बांधले. बेंजामिन म्हणाला, हात अभियांत्रिकी दर्जाच्या सामग्रीपासून बनविला गेला आहे जेणेकरून ते चार टन वजन सहन करू शकेल इतके मजबूत आणि टिकाऊ बनले.

या रोबोटीक हाताची विशेष गोष्ट म्हणजे, हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस एल्गोरिदमच्या मदतीने वापरकर्त्याच्या मेंदूतील तरंगांना इंटरप्रेट करु शकतो. यामध्य़े वापरण्यात आलेली इलेक्ट्रोएन्सेफलोग्राफी तंत्रज्ञानाच्या मदतीने मेंदूच्या इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करतं.