
सर्वात मोठी बायोमेट्रिक सिस्टम आधारला आणखी सुरक्षित आणि विश्वास बनवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. सरकारने आतापर्यंत 2.5 कोटींहून अधिक आधार नंबर बंद केले आहेत. ज्यांचे निधन झाले अशा व्यक्तींचेही आधार नंबर बंद करण्यात आले आहेत. आधार डेटाबेसला अपडेट ठेवणे आणि फसवणूक होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे.


























































