बीड – कल्याण महामार्गावर अडीच कोटी रुपयांची रक्कम जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड – कल्याण महामार्गावर अमळनेर चेक पोस्ट येथे तब्बल अडीच कोटी रुपये रोख रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी यांनी ही कारवाई केली. सदर रोख रक्कम बीडच्या एका मल्टिस्टेट सोसायटीची असल्याची माहिती समोर येत आहे.

सद्या लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मुख्य रस्त्यावर नाकाबंदी केली जात आहे. वाहनांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. या तपासणीमध्ये बीड कल्याण महामार्गावर अमळनेर चेक पोष्टवर तब्बल अडीच कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. ही रक्कम कोणाची आहे हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी मल्टिस्टेटची असल्याचे बोलले जात आहे. एवढी मोठी रक्कम जप्त केल्याने मल्टिस्टेटची चौकशी केली जाऊ शकते. निवडणूक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर जिल्हाधिकारी अमळनेरकडे रवाना झाले असल्याचे समजते आहे. रक्कम पकडल्यानंतर जिल्हाभरात एकच चर्चा सुरू झाली आहे.