अ‍ॅक्टीवा गाडीच्या डिकीतील २ लाख ४० हजार रुपये पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

उभ्या केलेल्या अ‍ॅक्टीवा गाडीच्या डिकीतील २ लाख ४० हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना शहरात घडली.

या प्रकरणी शिवानंद गजगेअप्पा थंबा रा. कव्वा हा.मु. पिनाटे नगर लातूर यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादी यांची अ‍ॅक्टीवा क्र. एमएच २४ बीबी ९०५३ ही बसस्थानक दुकानाजवळ झेरॉक्स काढण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने गाडीच्या डिकीचे हुक तोडून आतील २ लाख ४० हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.