हडपसरमध्ये भरधाव मोटारचालकाची बसला धडक; अपघातात दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव मोटार चालवून पीएमपीएल बसला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास हडपसर परिसरातील भेकराईनगर बसडेपोसमोर घडला. दीपक विभीषण वागज (वय 22, रा. शेटफळ, मोहोळ) आणि सुजीत चंद्रकांत मोरे (वय 19, रा. वाबी, माढा ) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसार पवार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दीपक आणि सुजीत मित्र होते. ते रंगकाम करीत होते. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दोघेही मोटारने सासवड रस्त्याकडे जात होते. त्यावेळी दीपकने भरधाव वेगात मोटार चालवून भेकराईनगर डेपोकडे वळणाऱ्या पीएमपीएल बसला समोरून धडक दिली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड अधिक तपास करीत आहेत.