चेंबूरमध्ये २ वर्षीय चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू

सामना ऑनलाईन । मुंबई

चेंबूरमध्ये नाल्यात पडून २ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. अरिहंत तांबोळी असं मृत मुलाचं नाव आहे. चेंबूरच्या चिता कॅम्पमध्ये दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. अरिहंत नाल्यात पडल्यानंतर तातडीने त्याला तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी बाहेर काढलं आणि उपचारासाठी गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी अरिहंतला मृत घोषित केलं.

आपली प्रतिक्रिया द्या