नगर जिल्ह्यात 20 नवे रुग्ण; अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 203 वर

561

नगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये सोमवारी दुपारी 20 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहर 13, कर्जत तालुका 2, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगार 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. नगर शहरात भराड गल्ली येथे 6, तोफखाना 4, शास्त्रीनगर 1, सातभाई मळा 1 आणि गानु बाजार येथे 1 रुग्ण आढळून आला. गवळी वाडा (भिंगार) 1, राहुरी तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे 1, रानेगाव (शेवगाव) 1, जामखेड येथे एक रुग्ण आढळून आला. कर्जत तालुक्यातील माही जळगाव आणि पाटेगाव येथे प्रत्येकी एक आणि पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे एक रुग्ण आढळून आला.

सध्या जिल्ह्यातील ॲक्टिव कोरना रुग्णसंख्या 203वर पोहचली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 418 झाली आहे. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 17 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांची एकूण संख्या 638 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या