गँगरेप प्रकरणी 20 वर्षांचा तुरुंगवास

बोरिवली येथे सात वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर झालेल्या गँगरेप प्रकरणी शाहरुख शेखला दिंडोशीच्या पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवले. शेखला 20 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पीडित मुलगी किराणा दुकानात गेली होती. तेव्हा तिला तिघांनी पकडून रिक्षात आणले. तिच्यावर गँगरेप केला. हा प्रकार कोणालाही सांगू नये अशी धमकी देऊन तिची सुटका केली. घरी आल्यावर तिने आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे, सहाय्यक निरीक्षक मानसिंग वचकल आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून तिघांना ताब्यात घेतले. दोन जण हे अल्पवयीन होते. शाहरुखलादेखील पोलिसांनी अटक केली. शाहरुख गेल्या सात वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहे.