
सामना ऑनलाईन । वसई
वसईच्या चिंचोटी परिसरात दोन दूध डेअऱ्यांवर धडक कारवाई करून दोन हजार किलो बनावट आणि भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या विशेष पथकाने अजय आणि साईनाथ या दोन डेअरीवर छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी छाप्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने घटनास्थळी जाऊन दोन्ही डेअऱ्यांमध्ये तपासणी करून, पनीर व इतर सामानाचे नमुने तपासणी साठी जप्त केले आहेत.
वसईच्या पूर्व भागातील मोठ्या प्रमाणात तबेले आणि दुध डेअऱ्या आहेत. येथून मुंबई आणि परिसरात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा होत असता. मात्र या डेअऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात दूध, तसेच पनीरमध्ये भेसळ होत असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पालघर पोलिसांनी येथील अजय आणि साईनाथ डेअरीवर छापा टाकला. यामध्ये 2 हजार किलो बनावट आणि भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने या डेअऱ्यांना सील ठोकले आहे.




























































