बुलढाण्यात 21 रिपोर्ट ‘निगेटीव्ह’, 17 रुग्णांना डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यात गुरूवारी 21 रिपोर्ट प्राप्त झाले. हे सर्व 21 रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 24 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे.

17  रूग्णांचे कोरोनासाठी दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 17 आहे, तर सध्या रूग्णालयात 6 रूग्ण उपचार घेत आहेत.   तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 76 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 6 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 403 प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.