साबरमती एक्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरल्याची घटना शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र काही प्रवासी जखमी झाले आहेत. वाराणसीहून अहमदाबादला जात असताना भीमसेन आणि गोविंदपुरी स्थानकादरम्यान रुळावर ठेवलेल्या जड वस्तूला धडकल्याने ट्रेन रुळावरून घसरल्याचे तपासात समोर आले. अपघातानंतर 50 मीटरपर्यंत रूळ उखडले असून लोखंडी क्लिप निखळली आहे. आयबी आणि यूपी पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.