बीड जिल्ह्यात अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये आढळले कोरोनाचे 233 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील सामुहिक संक्रमण रोखण्यासाठी पाच शहरात व्यापार्‍यांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टची तपासणी करण्यात आली. आज तिसर्‍या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 5122 व्यापार्‍यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात 233 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई, केज, परळी या पाच शहरामध्ये व्यापार्‍यांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट सुरू आहेत. आज शेवटच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाचही शहरातील मिळून 5122 जणांच्या तपासण्या झाल्या. यामध्ये 233 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. आष्टीमध्ये आज 963 जणांच्या तपासण्या झाल्या. त्यात 20 जण कोरोनाबाधित सापडले. माजलगावमध्ये 425 जणांची तपासणी झाली त्यात 62 जण बाधित निघाले. अंबाजोगाईत 1308 जणांची तपासणी झाली. त्यात 35 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. केजमध्ये 450 जणांची तपासणी झाली. त्यात 28 कोरोनाबाधीत निघाले. परळीत दिवसभरात 1976 जणांची तपासणी झाली. तब्बल 88 जण कोरोनाबाधित निघाले अजूनही काही बुथवर अ‍ॅन्टिजेन तपासणी सुरूच आहे. जिल्ह्यात आता एकुण 3474 कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. सध्या 1632 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 1766 जण घरी परतले आहेत. 76 जणांचा मृत्यू झाला आहे.