श्री भराडीदेवी यात्रोत्सवासाठी कुडाळ आगारातून 25 गाड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवासाठी कुडाळ एसटी आगार सज्ज झाले असून यात्रेकरू भाविकांच्या सेवेसाठी तालुक्यात 25 बसेस सोडण्यात येणार आहेत. सोमवार दि. 25 फेब्रुवारी रोजी यात्रोत्सवा दिवशी पहाटे 5 वा. पासून या बसेस सुटणार आहेत.

कुडाळ कट्टा – आंगणेवाडी 13 बस, कसाल – खोटले- आंगणेवाडी-1, कसाल-हिवाळे-आंगणेवाडी-1, निरूखे -डिगस मार्गे- आंगणेवाडी-1, पणदूर-अणाव मार्गे आंगणेवाडी -1, पणदूर- ओरोसमार्गे आंगणेवाडी-1, कडावल- आंगणेवाडी-1, हुबळीचा माळ कट्टा मार्गे आंगणेवाडी-1 अशा 25 गाड्या आंगणेवाडी यात्रेसाठी सोडण्यात येणार आहेत. तसेच सकाळी 7.30 वा घोडगे- आंगणेवाडी ज्यादा गाडी सोडण्यात येणार आहे. कुडाळमधून आंगणेवाडी यात्रेसाठी सुटणार्‍या सर्व गाड्या जुन्या बसस्थानक ( गांधीचौक) येथून पहाटे 5 वा. पासून सुटणार आहेत. तसेच दि. 26 रोजी दुपारपर्यंत ये- जा करणार्‍या फेर्‍या सुरू राहणार आहेत. तरी भाविकांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ एसटी आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.