देशातील 281 पुलांची अवस्था वाईट, गुजरातचा क्रमांक पहिला

1126
titwala-bridge
प्रातिनिधीक

देशातील 425 पुलांपैकी 281 पुलांची अवस्था वाईट आहे अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 59 टक्के पुलांची निर्मिती ही गेल्या पाच-सात वर्षांपूर्वी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातमध्ये सर्वाधिक पुलांची अवस्था वाईट आहे. सेंट्रल रोड रीसर्च इंस्टिट्युटने हे सर्वेक्षण केले होते. त्याच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दैनिक भास्कर या वृत्तपत्राने याबाबत बातमी दिली आहे. देशातील गुजरात राज्यात सर्वाधिक पुलांची अवस्था वाईट आहे. त्यांचे प्रमाण 75 टक्के इतके आहे. दुसर्‍या क्रमांकावर झारखंड तर तिसर्‍या क्रमांकावर पंजाबचा क्रमांक लागतो. एकूण पुलांपैकी 15 पुल वाहतुकीसाठी तत्काळ बंद करण्याचा सल्या देण्यात आला आहे. तसेच या पुलांची दुरुस्ती न केल्यास पुढील 10-12 वर्षात हे पुल कोसळू शकतात अशी शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.

अहवालानुसार 2017 साली देशभरात 15 हजार 514 पुलांचे अपघात झाले तर त्यात 5 हजार 543 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 2018 साली 16 हजार 12 अपघात झाले होते त्यात 5 हजार 693 लोकांचा मृत्यू झाला होता.

ज्या ज्या पुलांची अवस्था वाईट आहे त्यांच्या निर्मितीत खालच्या दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते. अनेक पुलांमध्ये भेगा आहेत. अनेक पुलांच्या जोडणी तुटत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या