एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱया प्रवाशांना पश्चिम रेल्वेने दणका दिला. एप्रिल आणि मे महिन्यात पश्चिम रेल्वेने एसी लोकलमधील 8500 फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करत 29 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरात उन्हाचा कडाका वाढल्यामुळे अनेकजण एसी लोकलमधून प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या जशी वाढतेय तशी विनातिकीट प्रवास करणाऱया फुकटय़ांचीदेखील संख्या वाढतेय. त्यामुळे एसी लोकलचे तिकीट असूनही अनेकांना उभ्याने प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने एसी लोकलमधून फुकटात प्रवास करणाऱया प्रवाशांविरोधात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत लाखो रुपयांची वसूली केली. याशिवाय पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल, एसी लोकल, मेल-एक्प्रेसमधील फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करत गेल्या दोन महिन्यांत पश्चिम रेल्वेने सुमारे 38 कोटी रुपयांची कमाई केली. यात मुंबई उपनगरीय लोकलमधील फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करत वसूल केलेल्या 10 कोटी रुपयांचा समावेश आहे.