कोपरगावात कत्तलीसाठीची 3 जनावरे पकडली; चालकाला अटक

645

संगमनेर येथे कत्तलीसाठी नेण्यात येणारी 3 जनावरे हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पकडली आणि कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिली. कोपरगाव शहर पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणारा चालक गणेश जगन सदाराम याला अटक करून कोपरगाव न्यायालयात हजर केले. न्यायालय़ाने त्याला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरा आरोपी पवन ठाकरे फरार झाला आहे.

येवला येथूनपांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅनमधून कत्तलीसाठी जनावरे कोपरगावकडे येत असल्याची माहिती येवला बजरंग दल कार्यकर्त्यांनी कोपरगावच्या हिंदूराष्ट्र कार्यकर्त्यांना दिली. या कार्यकर्त्यांनी ही पिकअप व्हॅन साईबाबा कॉर्नर येथे रविवारी रात्री 930 वाजण्याच्या सुमारास पकडली. जनावरे आणि वाहनचालकासह व्ह्रन कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिली. मात्र, खरेरीदार पळून गेला. त्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये 3 बैल आढळले. तीन बैल व एक पिकअप व्हॅन असा दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल कोपरगाव शहर पोलिसांनी जप्त केला आहे. त्यानंतर जनावरांची रवानगी गोकुळधाम गोशाळेत करण्यात आली. या प्रकरणी अमित अशोक जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन असे गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी चालक गणेश जगन सदाराम याला न्यायालयाक हजर करण्यात आले. त्याला कोर्टाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ तिकोणे करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या