Pakistan Ceasefire पाकिस्तानच्या गोळीबारात तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू

हिंदुस्थानने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान व पीओके मधील नऊ ठिकाणी एअरस्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर काही तासातच पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार व मोर्टार डागले. या हल्ल्यात तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाल आहे.

ऑपरेशन सिंदूर 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिंदुस्थानी सैन्याने बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु करून हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हे हल्ले बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे करण्यात आले आहेत.