Bangalore Stampede : 35 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 3 लाख चाहते पोहोचले, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला

बेंगळुरूमध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजय परेड दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले, जे धोक्याबाहेर आहेत, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना सिद्धरामय्या म्हणाले, “आरसीबी टीम विधानसभेत पोहोचली तेव्हा विधानसभेबाहेर एक लाख लोक जमले होते. विधानसभेत आनंद साजरा केला जात होता, पण चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. स्टेडियमची क्षमता 35 हजार होती. पण बाहेर 3 लाखांहून अधिक लोक जमले होते. आम्हाला एवढ्या मोठ्या गर्दीची अपेक्षा नव्हती. कोणीही याची अपेक्षा केली नव्हती. आम्ही यासाठी तयार नव्हतो.”