एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या तीन हजार जागा रिक्त

220

महाविद्यालये सुरू झाली तरी अजूनही हजारो विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. 26 ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. अकरावीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असताना दुसरीकडे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांना (एमसीव्हीसी) तीन हजारांवर जागा रिक्त आहेत. एमसीव्हीसीला प्रवेश घेऊन इंजिनीयरिंग, पॅरामेडिकल, ऍग्रीकल्चर, कॉमर्स, होम सायन्स आणि फिशरीज अशा सहा गटांमध्ये एमसीव्हीसीचे अभ्यासक्रम विभागले आहेत. मुंबईतील सुमारे 70 संस्थांमध्ये एमसीव्हीसी अभ्यासक्रमांना सहा हजारांवर जागा उपलब्ध आहेत. त्यातील अर्ध्याअधिक जागा भरल्या गेल्या असून इतर जागा रिक्त आहेत.

या अभ्यासक्रमांना एका वर्गात फक्त 30 विद्यार्थी असतात. त्यामुळे प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणे शक्य होते, असे प्रा. विद्याधर गोडबोले यांनी सांगितले. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असून https://mumbai.11thadmission.net या संकेतस्थळावर त्यासाठी नोंदणी करता येऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या