
जम्मू-काश्मिरात यावर्षी पावसाने प्रचंड नुकसान केले असून, पंथरा दिवसांत शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. १४ ऑगस्ट रोजी किश्तवारमध्ये ६५ जणांचा तर १७रोजी कठुआमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. हे संकट ताजे असताना २६ रोजी पुन्हा भूस्खलनाची घटना समोर आली कटरा येथील वैष्णोदेवी यात्रा मार्गावरील या भूस्खलनात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला. यह मदत व बचावकार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे.
आठवडाभरापासून काश्मिरात पावसाचे धुमशान सुरु आहे. २४ तासात २५० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. वामुळे अनेक ठिकाणी चूरसदृश परिस्थिती निर्माण खाली आहे. परे आणि शेतात पाणी शिरले असून, भूस्खलनामुळे अनेक पूल आणि रस्ते खराब झाले आहेत. साडेतीन हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित विकाणी नेण्यात आले. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, रेल्वेने जम्मू-कटरा येथून धावणाऱ्या आणि यांवयाय एसडीआरएफ, लष्कर बचाव कार्य करत आहेत. उत्तर २७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भूस्खलन झाल्यानंतर डिगावाखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. भूस्खलनानंतर दिगायाखाली अद्यापही अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळित झाले.
भूस्खलनानंतर या भागातील वाहतुकीवर मोठा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. साज, कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. जम्मू-काभीरमधील अनेक भागात इंटरनेट सेवा बंद आहे. जम्मू विभागाच्य आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख रमेश कुमार यांनी पुढील ४० तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विनाकारण बाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन
जम्मू-काश्मिरात आठवडाभरापासून पावसाने दाणादाण उडाली आहे. यामुळे सर्वत्र यंत्रणा ठप्प झाल्या असून, जनर्जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने लोकांना विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे. जम्मूतील नद्या तानी, चिनाब या धीवयाच्या पातळीच्या वर वाहत आहेत, चिनाब नदीजवळ काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे.