
प्ले स्टोअरमधील 33 लोकप्रिय ऍप्समध्ये धोकादायक मालवेअर घुसले आहे. त्यामुळे हे ऍप इन्स्टॉल केल्यास मोबाईलमध्ये व्हायरस शिरू शकतो, अशी माहिती हाती आली आहे. त्यामुळे हे ऍप अनइन्स्टॉल करावे, असा सल्ला जाणकार देत आहेत.
रोजच्या वापरातील ऍपना मालकेअरची लागण झाली आहे. जीपीएस फिक्सर हा असाच एक लोकेशन डिटेक्टर ऍप आहे. यालाही मालकेअरची लागण झाली आहे. तसेच क्यूआर कोड रीडर, क्यूआर कोड बार कोड स्कॅनर, फ्री इमोजी कीबोर्ड स्कॅनर अशा ऍप्सला मालकेअरची लागण झाली आहे. याशिवाय काही डिक्शनरी ऍप, विशेषत: इंग्लिश टू उर्दू ऑफलाइन डिक्शनरी ऍपमध्ये व्हायरस घुसला आहे.
रस्ते शोधण्यासाठी सामान्यतः लोक गुगल मॅप्सचा वापर करतात. पण गुगल ऍप्सप्रमाणे रुट फाइंडर ऍपचाही वापर केला जातो. हे ऍप आता डिलीट करा. याशिवाय जीपीएस स्पीडोमीटर आणि जीपीएस स्पीडोमीटर प्रो हे लोकप्रिय ऍपही धोकादायक ठरत आहेत.
धार्मिक ऍप बनले धोकादायक
प्ले स्टोअरवर धार्मिक ऍपची संख्या भरपूर वाढली आहे. यापैकी मुस्लिम प्रेयर, किबाला कंपास, प्रेयर टाइम्स यासारखे लोकप्रिय ऍप्समध्ये मालकेअर घुसले आहे. हू अनफ्रेण्डेड मी, हू डिलीटेड मी सारखे फेसबुकशी संबंधित सोशल मीडिया ऍपवरही या मालकेअरचा हल्ला झाला आहे.
























































