नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात 345 पाळणा केंद्र

राज्यातील नोकरदार महिलांच्या मुलांसाठी सुरक्षित आणि पोषणयुक्त वातावरण निर्माण करणारी  पाळणा केंद्र योजना महाराष्ट्रात सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात 345 पाळणा केंद्रे सुरू होणार असून, यासाठी मिशन शक्ती अंतर्गत केंद्र व राज्य शासन अनुक्रमे 60ः40 या हिश्शाने निधी उपलब्ध करून देणार आहे. या योजनेमुळे मातांना रोजगाराच्या संधी साधता येतील तर मुलांना बालस्नेही संगोपनाची नवी दिशा मिळेल. ही योजना खऱया अर्थाने नोकरदार महिलांच्या सबलीकरणाकडे व बालकांच्या विकासाकडे नेणारे ऐतिहासिक पाऊल ठरेल. ही योजना केवळ एक शासकीय उपक्रम नसून प्रत्येक आईसाठी दिलासा आणि प्रत्येक बालकासाठी भविष्याची हमी आहे, असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.