
मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमधील सर्वात जोशपूर्ण व नावाजलेला 34 वा डालमिया लायन्स उत्सव सुंदर नगर, मालाड पश्चिम येथील महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला. या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेमध्ये 27 विविध स्पर्धांमध्ये 54 महाविद्यालयांतील 2700 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य, विश्वस्त लायन कन्हैयालाल सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लायन विकास सराफ आणि लायन अमित गुप्ता यांच्या उपस्थितीत आयोजित या मंत्रमुग्ध करणाऱया या उत्सवास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. दिगंबर गंजेवार, उत्सवाचे संयोजक डॉ. सचिन बनसोडे, चित्रपट संवाद लेखक व गीतकार संजय मासूम श्रीवास्तव, झुम्मा मित्रा, डॉ. शरद रुईया, प्रा. दीपिका शुक्ला, डॉ. सुनीता पाल, डॉ. पूनम बियानी आदी उपस्थित होते.


























































