
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
17 व्या लोकसभेचे पहिले सत्र मंगळवारी संपले. या सत्रात 37 बैठका पार पडल्या तसेच 35 विधेयकं पारित झाली. यंदाच्या सत्राने 1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभा सत्राचा रेकॉर्ड तोडला आहे. पहिल्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात 24 विधेयकं पारित झाली होती. यंदाच्या सत्रात तिहेरी तलाक आणि जम्मू कश्मीर सारख्या मोठ्या विधेयकांचा सामावेश आहे.
17 जून ते 6 ऑगस्ट हे सत्र चालले. या सत्रात एकूण 37 बैठका पार पडल्या. तर 280 तास कामकाज चालले. सत्र चांगल्या पद्धतीने चालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि सर्व पक्षांच्या नेत्यांचे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी आभार मानले.
पहिल्या सत्राची वैशिष्ट्यै
- 1 हजार 66 प्रकरणे शुन्यकाळात उपस्थित करण्याची परवानगी
- 18 जुलै रोजी 161 खासदारांनी आपले मुद्दे उपस्थित केले.
- दर दिवसाला सरासरी 7.6 प्रश्नांची उत्तरे, गेल्या 20 वर्षात हे प्रमाण 3.35
- 265 नवनिर्वाचित खासदार, सर्वांना बोलण्याची मिळाली संधी
























































