गोवंडीत 35 लाखांचा ड्रग्ज पकडला

नालासोपारा येथून गोवंडीत कोकेन आणि एमडी ड्रग्ज विकायला आलेल्या एका नायजेरियन तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 35 लाख किमतीचा एमडी व कोकेन साठा पोलिसांनी जप्त केला. एक नायजेरियन ड्रग्ज तस्कर कोकेन आणि एमडी विकायला गोवंडी परिसरात येणार असल्याची खबर घाटकोपर युनिटला मिळाली.

त्यानुसार पथकाने बैंगनवाडी परिसरात सापळा लावला. ड्रग्ज तस्कर तेथे आल्याचे खबऱ्याने सांगताच पोलिसांनी केनेथ ओकेके (32) या नायजेरियन तस्कराला पकडले. त्याच्या अंगझडतीत 20 लाखांचे एमडी आणि 15 लाखांचे कोकेन सापडले.

आपली प्रतिक्रिया द्या