सेलूतील 36 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 4 हजार 77 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-test-11

सेलूसाठी दिलासा देणारी बातमी असून राज मोहल्ला भागातील कंटेन्मेंट झोनमधील 4 हजार 77 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यांच्यातील कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. तसेच त्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व 36 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

सेलू शहरातील कोरोनाबाधित रुग्ण नांदेड येथे आढळल्यानंतर त्या रूग्णाचे शहरातील एक रात्र, एक दिवसाचे वास्तव्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी शहरात तीन दिवसांचा कर्फ्यू लावला. प्रशासनाने राजमोहल्ला आणि लगतचा परिसर पुर्णपणे निर्ज॔तूकीकरण करून सिल केला. 30 एप्रिल आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांची बैठक घेऊन राजमोहल्ला आणि परिसरातील कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी 14 टिम तयार करण्यात आल्या. या टिममध्ये तीन डॉक्टर, तीन पर्यवेक्षक, 14 शिक्षक, 14 नर्स व अंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे. हे कर्मचारी 30 एप्रिल ते 13 मेपर्यंत सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणात कोणाला ताप, खोकला, सर्दी, एखादा जुना आजार आहे का, कुणी परदेशातून किंवा पुणे, मुंबई, बाहेरगावाहून आले आहे का, याविषयी व कुटुबांतील प्रत्येक सदस्याची माहिती घेतली जात आहे.