
नव्याने बढती मिळालेले 36 उपनिरीक्षक यांच्या जिल्हांतर्गत बदलीचे आदेश देण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. तर दुसरीकडे वरिष्ठ पातळीवरच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक पातळीवरच्या बदल्यांची प्रक्रिया ही सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या बदल्यांचा विषय हा प्रलंबित होता सरकार बदलल्यानंतर हा विषय मागे राहिलेला होता. नगर जिल्ह्यामध्ये या अगोदर आंतर जिल्हा बदलीने 164 जणांची नियुक्ती झालेली होती पण दुसरीकडे अनेक पद सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत.
नगर जिल्ह्यामध्ये ज्या पोलिसांना बढती देण्यात आलेली आहेत व ते उपनिरीक्षक झालेले आहेत असे उपनिरीक्षक हे पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत होते. त्यांची संख्या ही 36 होती या उपनिरीक्षकांना आता पोलीस ठाणे अंतर्गत कामकाज देण्यात यावे या उद्देशाने या प्रकारच्या बदल्या केले असल्याच
अधीक्षक ओला यांनी सांगितले.
पोलीस दलांतर्गत नव्याने होणाऱ्या बदलांच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरून ज्यावेळेला आदेश येतील. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. अगोदर वरिष्ठ पातळीवरच्या बदल्या पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक पातळीवरच्या बदल्यांचा विचार होईल व त्यानुसार आपल्याकडे या बदल्या केल्या जातील असे त्यांनी स्पष्ट केले.



























































