
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी 13 उमेदवारांनी 41 अर्ज खरेदी केले असून दोन दिवसात 28 उमेदवारांकडून 79 अर्ज खरेदी करण्यात आले आहेत.
लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देणे व घेणे तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याकरिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी 38 तर दुसऱ्या दिवशी 41 अर्जाची विक्री झालेली आहे. परंतु एकाही उमेदवारांनी आज ही अर्ज दाखल केलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता तसेच अर्ज खरेदी करण्याकरिता सकाळी 11 ते दुपारी 3 ही वेळ ठरविण्यात आलेली असून इच्छूक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून अर्ज घेवून जावेत. तसेच परिपूर्ण अर्ज दिनांक 26 मार्च 2019 पर्यंत दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
































































