
सिद्धेश्वर एक्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याची साडेपाच कोटींचे सोने असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन पथके या गुह्याच्या तपासासाठी नियुक्ती करण्यात आली आहेत. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गोरेगाव येथील सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी अभयकुमार जैन हे 6 डिसेंबर रोजी सिद्धेश्वर एक्प्रेसच्या एसी कोचमधून सोलापूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग लॉक करून कोचखाली ठेवली होती. प्रवासादरम्यान झोपलेल्या जैन यांना पहाटे कल्याण स्टेशनजवळ जाग आली. त्यांनी कोचखाली ठेवलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती गायब झाली होती.



























































