मध्यान्ह भोजनाच्या उकळत्या डाळीत पडून चिमुरडीचा मृत्यू

प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्यान्ह भोजनासाठी शिजविण्यात येणाऱ्या उकळत्या डाळीच्या टोपात पडून एका पाच वर्षाच्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशमधील शाहडोल जिल्ह्यात घडली आहे. सुहासिनी बैगा असे त्या मुलीचे नाव आहे. दुर्घटनेनंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र चार दिवसांनी तिचा मृत्यू झाला.

उंबरवाडीची अंगणवाडी धोकादायक

शाहडोल जिल्ह्यातील ओखणी गावात असलेल्या अंगणवाडीत सुहासिनी शिकत होती. सोमवारी मध्यान्ह भोजनाच्या काही वेळ आधी स्वयंपाकघरातून एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्या त्यानंतर शिक्षक व जेवण बनवणारे तेथे पोहोचले असता त्यांना सुहासिनी उकळत्या डाळीच्या टोपात पडलेली दिसली. त्यानंतर सुहासिनीला टोपातून बाहेर काढण्यात आले व स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या दरम्यान या बाबत एकाही प्रसासकीय अधिकाऱ्याला तसेच पोलिसांना कळविण्यात आले नव्हते. याविषयी तीन दिवसांनंतर रुग्णालयाने पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी व अधिकाऱ्यानी तिला जबलपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सकस आहाराचा बट्ट्याबोळ, बालकाला दिलेल्या अंड्यात आढळले चक्क पिल्लू

अंगणवाडी शिक्षिकेने उपचारासाठी दिले २५० रुपये
सुहासिनीसोबत झालेल्या दुर्घटनेबाबत तिच्या वडीलांना अंगणवाडी शिक्षिकांनी कळवले. त्यानंतर त्यांनी मला उपचारासाठी फक्त २५० रुपये दिले. त्यामुळे मला माझ्या मुलीला जिल्हा रुग्णालयात न्यावे लागले. शिक्षकांच्या दुर्लक्षपणामुळे आज मला माझी मुलगी गमवावी लागली आहे, असा आरोप सुहासिनीचे वडील बैसाखू बैगा यांनी केला आहे.

summary : 5-year-old dies after falling in boiling dal at Madhya Pradesh anganwadi centre