ट्रॅफिकमधून मुंबईकरांची सुटका, बेस्टच्या ताफ्यात 500 मिनी बस

1380

मुंबईच्या ट्रफिकमधून वाट काढण्यासाठी छोट्या गाडय़ांची असलेली मागणी दूर करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात आता 500 मिनी एसी बसचा समावेश होणार आहे. मुंबईत अशा सहा मिनी एसी बस आल्या असून त्याचे उद्घाटन उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात कुलाबा येथे होणार आहे.

बेस्टच्या तिकीटदरात ऐतिहासिक कपात झाल्यानंतर बेस्टच्या प्रवाशांची संख्या वाढल्याने बसेसची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने भाडेतत्त्वावर आणखी 1 हजार बसेस घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये 500 मिनी वातानुकूलित सीएनजी आणि 500 मिनी वातानुकूलित डिझेल या प्रकारातल्या एक हजार गाडय़ांचा समावेश असून त्यांची किंमत 2,622 कोटी रुपये इतकी आहे. या मिनी बसेस एसी असून डिझेलवर धावणाऱया आहेत. या बसेसचा उपयोग मुंबईच्या ट्रफिकमधून मार्ग काढण्यासाठी होणार आहे.

यापूर्वी बेस्टने 400 एसी मिनी बसेस आणि 80 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्राच्या फेम-1 योजनेंतर्गत आणखी 300 बसेस अशा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवायही आणखी 1 हजार गाडय़ा ताफ्यात समाविष्ट करून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात आता भाडेतत्त्वावरील बसेसची संख्या 1800 पर्यंत जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या