मिठी नदीच्या विकासकामांसाठी आतापर्यंत 538 कोटींचा खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिठी नदीच्या खोलीकरणाचे 100 टक्के काम पूर्ण झाले आहे तर रुंदीकरणाचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मिठी नदीच्या विकासकामासाठी आता 538 कोटी 40 लाख रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती  सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

मिठी नदीचा विकास करून पर्यटनस्थळ करण्याबाबत सुनील राणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मिठी नदीचे रुंदीकरण, खोली वाढवणे, अतिक्रमण हटवणे व पर्यटनस्थळ करण्याबाबत प्रश्न केला होता. त्यावर मिठी नदीच्या संवर्धनासाठी 18 ऑगस्ट 2005 रोजी मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. मिठी नदीच्या विकासाचे दोन टप्प्यांत काम करण्यात आले आहे. मिठी नदीच्या विकासासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत 640 कोटी रुपये खर्च केले आहेत, तर एमएमआरडीएच्या अख्यत्यारित मिठी नदीच्या विकासाचे दोन टप्प्यांत काम करण्यात आले. त्यावर 538 कोटी 40 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती नगरविकासमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली आहे.