
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
केंद्र सरकारने आज देशभरातील साखरसम्राटांवर अनुदानाची खैरात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 50 लाख टन साखर निर्यातीवर वाहतूक अंशदान देण्याचा तसेच शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठीचे अंशदान प्रति क्विंटल 5.5 रुपयांवरून वाढवून 13.88 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय आज झाला. गेल्या जूनमध्ये सरकारने साडेआठ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर आज 5538 कोटी रुपयांचे पॅकेज दिले. त्यामुळे सुमारे 14 हजार कोटींचे पॅकेज साखर उद्योगाला मिळणार आहे.























































