खास मोबाईल नंबरसाठी मोजले 7 कोटी

पसंतीच्या वाहन नंबरसाठी हवे तितके पैसे मोजल्याचे अनेकदा पाहिले आहे. परंतु, दुबईत एका व्यक्तीने खास मोबाईल नंबरसाठी तब्बल 7 कोटी रुपये मोजले आहेत. दुबईतील एका खास कार्यक्रमात ही बोली लावण्यात आली. 058-7777777 या मोबाईल नंबरसाठी बोली 22 लाखांपासून बोली सुरू झाली. लाखांवरून ती कोटी आणि अखेरला 7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. ही बोली एका चॅरिटीसाठी लावण्यात आली होती. या बोलीमध्ये 10 फॅन्सी नंबर प्लॅट आणि 21 एक्सक्लूसिव्ह मोबाईल नंबरचा समावेश होता.