बारदानाची 7 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकल्याच्या कारणावरून हैदराबाद येथील व्यापारी अजयकुमार सुशीलकुमार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणुनगर (पंढरपूर) आणि दामाजी सहकारी साखर कारखाना (मंगळवेढा) तसेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चंद्रभागानगर यांच्याविरोधात हैदराबाद येथील न्यायालयात वसुलीसाठी दावा दाखल केला आहे.
अजयकुमार हे साखर कारखान्यांना शुगर बॅग, राईस बॅग, बेसीयन क्लॉथ, पीपी सॅक यांचा पुरवठा करतात. 100 किलो, 50 किलोचे थैले त्यांनी कारखान्यांना 1998 पासून विक्री करत आहेत. मात्र, 2016 पासून थकबाकी वाढत गेल्यामुळे कारखान्याने हात वर करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी दावा दाखल केला.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या नावाने चंद्रभागानगर (भाळवणी) येथे सुरू असलेल्या साखर कारखान्याविरोधात 35 लाख 16 हजार 519 रुपयांचा दावा हैदराबाद येथील व्यापारी अजयकुमार यांच्या वतीने रामावतार अग्रवाल यांनी चिफ जज सिटी सिव्हिल यांच्या न्यायालयात 3 डिसेंबर 2021 रोजी दाखल केला आहे. या दाव्यानुसार मुद्दल 18 लाख 61 हजार 145 रुपये, तर व्याज 16 लाख 55 हजार 374 रुपये वसुलीची मागणी केली आहे. याप्रकरणी अध्यक्ष कल्याण काळे, व्हाईस चेअरमन राजेंद्र शिंदे, एम. डी. झुंझार आसबे यांना पार्टी करण्यात आले आहे. कारखान्यातर्फे न्यायालयात रक्कम देण्याचे कबूल करण्यात आले होते. त्यानंतर अद्याप एक रुपयाही दिला नाही.
विठ्ठल कारखान्याकडे पावणेपाच कोटी थकले
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने अजयकुमार यांचे बारदानाचे 4 कोटी 75 लाख 58 हजार 313 रुपये थकविले आहेत. अजकुमार यांच्या वतीने अमन अग्रवाल यांनी हैदराबादच्या कोर्टात मार्च 2024 मध्ये वसुलीचा दावा दाखल केला आहे. 4 कोटींमध्ये मुद्दल रक्कम 1 कोटी 82 लाख 5 हजार 33 असून, व्याज 2 कोटी 93 लाख 53 हजार 180 एवढे आहे. मुद्दलापेक्षा व्याज जास्त झाले आहे. या दाव्यातही चेअरमन, व्हा. चेअरमन एमडीसह जॉइंट डायरेक्टर (शुगर) सोलापूर यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. 26 डिसेंबर 2023 ला कायदेशीर नोटीस पाठवली. ई-मेल, पोस्टाद्वारे, समक्ष मागणी करूनही दखल घेतली नाही, असे दाव्यात म्हटले आहे.
साखर घोटाळ्याचाही होता आरोप
सन 2020-21 या कर्षात रिकक्हरी कमी दाखकून 20 कोटी 66 लाखांची साखर परस्पर विक्री केल्याचा आरोपही चेअरमन व संचालकावर करण्यात आला होता. अभिजित पाटील यांनी संचालक मंडळाकर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी 26 एप्रिल 2024 रोजी कारखान्याचे तीन गोडावून सील करण्यात आले होते.
‘संत दामाजी’कडे 2 कोटी थकले
संत दामाजी कारखान्याविरोधात अजयकुमार यांच्यामार्फत अमन अग्रकाल यांनी मार्च 2024 मध्ये 2 कोटी 32 लाख 88 हजार 194 रुपयांच्या कसुलीसाठी दावा दाखल केला आहे. यात मुद्दल 1 कोटी 12 लाख 13 हजार 298 रुपये असून, मार्च 2024 पर्यंतचे क्याज 1 कोटी 20 लाख 74 हजार 976 रुपये एवढे आहे. कायदेशीर नोटीस बजावूनही चेअरमन, एम.डी. व्हाईस चेअरमन यांच्यासह जॉइंट डायरेक्टर (साखर) सोलापूर तसेच को-ऑप. सोसायटीचे कमिशनर ऑफ को-ऑप. रजिस्टार पुणे यांना पार्टी करण्यात आले आहे.